। नाशिक । वृत्तसंस्था ।
उपचाराच्या नावाखाली नवविवाहितेवर एका भोंदूबाबाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नाशिकच्या वडाळा गाव येथील मेहबुबनगरात ही घटना घडली आहे. नुकतेच लग्न झालेल्या पीडित महिलेला पोटदुखीचा त्रास होत होता. म्हणून सासरच्या मंडळींनी उपचार करण्यासाठी तिला भोंदूबाबाकडे नेले. आरोपी हुसन यासीम शेखने पीडित महिलेला भूतबाधा झाल्याचे सांगितले. मात्र, त्याने पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीसुद्धा आरोपी हुसन यासीम शेखने महिलेला दिली.
याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी आरोपी हुसन यासीम शेख विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला असून त्याला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.