कल्याणमध्ये तरूणीचा विनयभंग

| कल्याण | वृत्तसंस्था |

कल्याण पश्चिमेतील बैलबाजार भागातील एका टिश्युपेपर कंपनीत तरूणीचा गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत या कंपनीतील मालकासह दोन कामगारांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या गुन्हाती आरोपी फरार झाले आहेत.

कंपनीतील कामगार गगन उर्फ पंकज कांदू याने पीडितेचा विनयभंग केला. मेहबुब शेख याच्या सांगण्यावरून पंकज आणि सोनी कांदू यांनी पीडितेला आपण बाहेरगावी फिरण्यासाठी जाऊ असे सांगितले. पीडितेला कल्याण रेल्वे स्थानक येथे बोलावून तिला सोबत घेऊन आरोपी पंकज आणि सोनी कांदू हे उत्तरप्रदेशातील कुशीनगर येथील त्यांच्या राहत्या घरी गेले. तेथे गगन उर्फ पंकज याने मेहुबुब याच्या सांगण्यावरून आपल्याशी लग्न केल्याचा देखावा निर्माण केला. तरुणीसोबत विवाह झाल्याची छायाचित्रे मोबाईलमध्ये काढून पीडितेची बदनामी केली.

उत्तप्रदेशातून परत कल्याणमध्ये आल्यावर तरूणीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांच्या पुढाकाराने पीडितेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा तपास सुरू केला आहे.

Exit mobile version