| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा परिसरात राहणाऱ्या तीस वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी संदीप (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.12) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीस वर्षीय विवाहित महिला पती आणि मुलासह राहत असून, आरोपी संदीप याने महिलेला मे महिन्यात प्रपोज केला. यावेळी महिलेने नकार दिला. त्यानंतर जून 2025 मध्ये महिलेच्या घरात प्रवेश करून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि लहान मुलाला आणि पिडीतेला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जुलै महिन्यात पुन्हा अत्याचार केला. आरोपीने पिडीतेला रस्त्यामध्ये गाठून तिच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.





