दुर्मिळ नारंगी कस्तुरीच्या पिल्लाची भरारी

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
विळे कोलाड या रहदारीच्या मार्गावर तीन दिवसांपूर्वी रस्त्याच्या मधोमध एक दुर्मिळ नारंगी कस्तूर पक्ष्याच्या पिल्लाने आधार मिळताच पुन्हा एकदा आकाशात भरारी घेतली. हे पिल्लू सुरक्षित ठिकाणी निपचित पडले होते. वाहनांच्या धडकेत त्याचा कधीही मृत्यू झाला असता. या पिल्लाला वांगणेवाडी येथील ह.भ.प. बबन महाराज वांजळे, शिक्षक विशाल वांजळे यांनी पक्षी अभ्यासक राम मुंडे यांच्या सहाय्याने जंगलात सुखरूप सोडून देऊन त्याचे प्राण वाचविले.

दुर्मिळ व लाजरा
नारंगी डोक्याचा कस्तूर भारतीय उपखंडात समावेशीत बांगलादेश, भारतात आंध्रप्रदेश,गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र व श्रीलंका आणि आग्नेय आशिया निवासी आहे. भारतीय उपखंडात स्थलांतराच्या दरम्यान हा लाजाळू पक्षी क्वचितच दिसतो. मागील दशकात या पक्ष्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने तो संकटग्रस्त व दुर्मिळ होत चालला असल्याचे असे पक्षी निरीक्षक देवेंद्र तेलकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर नमूद केले आहे.

Exit mobile version