रसायनीः जमीन मोजणीवरुन वादावादी

| रसायनी | प्रतिनिधी |

जमिनीच्या सरकारी सर्व्हेंत व्यावसायिक निलेश बाबरे यांना जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी रसायनी पोलिसांध्ये चौघांवर ॲट्रासिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासांबे मोहोपाडा हद्दीजवळील बारवई समतानगर येथील निलेश सुरेश बाबरे हे परिसरात व्यवसाय तसेच जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. याच परिसरातील गुरींदरसिंग अरोरा यांचे मालकीची मौजे खानावळे (पोयंजे) बिनशेती गट क्रमांक 136/1 व गट क्रमांक 137 मधील एकुण क्षेत्रफळ 8070 चौ.मी. जमीन विक्री व्यवहाराचा करार इन्फिनिटी इन्फ्रा तर्फे भागीदार सनाउल्लाह इरशाद यांचेशी झालेला आहे. सदरचा व्यवहार हा निलेश बाबरे यांच्या मध्यस्थीने झाला होता तसेच सदर व्यवहारापोटी सनाउल्लाह इरशाद हे सदर जमिनीवर बांधकाम करीत असलेल्या इमारतीचे बिल्डींग साहित्यही निलेश बाबरे यांना देणार होते. गुरींदरसिंग अरोरा यांनी सनाउल्लाह इरशाद यांचेशी जमिन विक्रीचा करार केलेल्या जमिनीपैकी मौजे खानावळे गट क्रमांक 136/1 या जमिनीबाबत वामन रामचंद्र गायकर व इतर हे नेहमी हस्तक्षेप करून अतिक्रमण करीत असल्याने सदरचा व्यवहार रखडलेला आहे.

गुरींदरसिंग अरोरा यांनी त्यांची मौजे खानावळे येथील बिनशेती गट क्रमांक 136/1 व गट क्रमांक 137 मधील एकुण क्षेत्रफळ 8070 चौ. मी. या जागेचा सरकारी सर्व्हे करण्यात येणार होता. सदर जमिनीचा व्यवहार निलेश बाबरे यांनी केलेला असल्याने सदर ठिकाणी सरकारी सर्व्हेच्या वेळी ते स्वतः गुरींदरसिंग अरोरा, सनाउल्लाह इरशाद, प्रकाश बाळाराम बाबरे व इतर यांचेसह हजर होते. त्यावेळी सरकारी सर्व्हे करणारे अधिकारी व कर्मचारी हे पोलीस संरक्षणात सरकारी सर्व्हे करीत असताना वामन रामचंद्र गायकर तसेच त्यांच्यासह असणारे 15 ते 20 महिला व पुरूष असे सदर ठिकाणी आले व सरकारी सर्व्हे करण्यास विरोध केला. त्यावेळी निलेश बाबरे यांनी गुरींदरसिंग अरोरा व सनाउल्लाह इरशाद यांना जमिनीचा व्यवहार करून दिल्याचा व मला ठेका मिळाल्याचा राग मनात धरून तसेच महार या अनुसुचित जातीचा आहे व हे माहिती असताना देखील वामन रामचंद्र गायकर, संगिता मनोज गायकर, मनोज वामन गायकर व सरिता वामन गायकर यांनी जातीवाचक शिवीगाळी केली. याप्रकरणी बाबरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version