| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोबिवली-कल्याण तालुका यांच्यावतीने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत तालुक्यातील 32 संघांनी सहभाग घेतला होता. यात विजेता ठरला जय हनुमान रासल, तर उपविजेता ठरला नाथ भैरव संघ झाप, तृतीय स्वयंभू हनुमान संघ चिवे, चतुर्थ क्रमांक भैरवनाथ क्रीडा मंडळ वावेने पटकाविला. सर्व विजयी संघांना मंडळाच्या वतीने रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले. सदर कबड्डी स्पर्धेत स्पर्धा निरीक्षक म्हणून संदीप देसाई यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू नितेश लहाने रासळ, उत्कृष्ट चढाई प्रदीप हिर्डेकर वावे, उत्कृष्ट पक्कड कल्पेश देशमुख झाप, पब्लिक हिरो स्वप्नील भिलारे चिवे हे ठरले आहेत. या खेळाडूंनादेखील मंडळाच्या वतीने आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, उपमहापौर शरद गंभीरराव, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, सुधागड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संदेश शेवाळे, सु.ता.र. सेवा संघ ठाणेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे आदींची उपस्थिती होती.