राशिदचा डबल धमाका

चार बळी टिपत कुटल्या नाबाद 79 धावा

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई इंडियन्सविरोधात राशिद खानने फिरकीचा जलवा दाखवून चार बळी मिळवत फलंदाजी करताना नाबाद 79 धावा कुटल्या. राशिदने या इनिंगमध्ये 10 षटकार आणि 3 चौकार ठोकले. टी-20 क्रिकेटमध्ये 8 व्या नंबरवर फलंदाजी करून सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रमही राशिदच्या नावावर नोंदवला गेला आहे.

राशिद टी-20 क्रिकेटमध्ये 550 विकेट्स घेणारा जगातील पहिला फिरकीपटू बनला आहे. राशिदने आतापर्यंत टी-20 मध्ये एकूण 551 विकेट घेण्याची कमाल केली आहे. याशिवाय राशिदने टी-20 करिअरमधील सर्वात मोठा वैयक्तित स्कोअर केला आहे. राशिदने मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात फक्त 32 चेंडूत 79 धावांची नाबाद खेळी केली. राशिदचा आयपीएलमधील हा पहिले अर्धशतक आहेच, परंतु, टी-20 क्रिकेटमध्ये अफगानिस्तानच्या या अष्टपैलू खेळाडूचा सर्वात मोठा विक्रम आहे.

याशिवाय राशिद आयपीएलच्या इतिहासात नंबर 8 वर फलंदाजी करून सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाजही बनला आहे. राशिदने अशी कामगिरी करून पॅट कमिन्सला मागे टाकलं आहे. कमिन्सने 2021 मध्ये 8 व्या नंबरवर फलंदाजी करून 66 धावांची खेळी केली होती. तर हरभजन सिंगने 2015 च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरोधात 8 व्या नंबरवर फलंदाजी करून 64 धावा कुटल्या होत्या.

Exit mobile version