हायकोर्टाने याचिकाही फेटाळली
। पुणे । वृत्तसंस्था ।
राज्यात बहुचर्चित बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग प्रकरणी केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राज्यातील पोलिसांच्या बदल्या, नियुक्त्या यांची गोपनीय माहिती कथितरित्या लीक केल्याच्या संदर्भात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रश्मी शुक्ला यांनी आपल्याविरोधात सुरू असलेली कारवाई रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र शुक्लांविरोधात जर काही कारवाई करायची असेल तर मुंबई पोलिसांनी त्यांना सात दिवस आधी नोटीस द्यावी, असे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.