| रसायनी | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित विविध स्पर्धा सुरू आहेत. त्यातील वादविवाद स्पर्धेत राजिप ग्रामीण उत्कृष्ट उच्च प्राथमिक शाळा वडगावचे उपक्रमशील व अभ्यासू शिक्षक सुभाष राठोड यांची केंद्र, तालुका व विभागात उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंवाई, पालघर या जिल्ह्यातून मुंबई विभागातून राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे जिल्हाभर कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुभाष राठोड यांच्याबरोबरच मुंबई महापालिकाचे किसन मोरे, पालघरच्या वाकपट्टू प्रतिभा कदम, नवी मुंबईच्या आरती औचर व रायगड माणगावच्या अपूर्वा जंगम यांची सुद्धा राज्य स्तरासाठी निवड करण्यात आलेली आहे. सुभाष राठोड यांचे विशेष कौतुक यासाठी होत आहे की, त्यांचा अलीकडेच जीवघेणा अपघात झाला होता. मात्र तरीही त्यांनी चार स्पर्धेत भाग घेत चारही ठिकाणी अव्वल बक्षीस जिंकलेली आहेत. त्यांनी अपघातात पाय गमावून सुद्धा तसूभर आत्मविश्वास कमी न होऊ देता जिद्दीने भरारी घेत आहेत. त्यांच्या जिद्दीला व आत्मविश्वासला सर्व स्तरातून कौतुकाने सलाम केला जात आहे.
राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेसाठी सुभाष राठोड यांची निवड
