। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील कडसुरे गावातील नवीन रास्तधान्य दुकान श्रम साफल्य सहायता महिला बचत गटास देण्यास अन्य महिला बचत गटांनी विरोध दर्शविला आहे,हे रेशन दुकान श्रमसाफल्य बचत गटास मिळावे यासाठी गावातील काही पुढारी राजकारण करून प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु याबाबत आमचा तीव्र आक्षेप असुन हे रास्तधान्य दुकान जास्तीत जास्त सदस्य संख्या असलेल्या गावातील इतर सहा महिला बचत गटाला एकत्रितपणे ग्रामसंघ करुन सर्व संमतीने देण्यात यावे. तसेच महिलांची फसवणूक करून चुकीची माहिती देऊन दुकान मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या श्रम साफल्य सहायता महिला बचत गटाचा अर्ज रद्द करावा व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कडसुरे गावातील अनन्य स्वयं सहायता समूह, चौंडेश्वरी महिला बचत गट, मरिआई स्वंय सहायता समूह, स्मरण स्वंय सहायता समूह बचत गट, जय मल्हार स्वंय सहायता समूह, एकता स्वंय सहायता समूह आदी बचत गटांनी
एका निवेदनाद्वारे रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे केली आहे. या निवेदनाची प्रत रायगडचे जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, कडसुरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना देण्यात आली आहे.






