ऑलिम्पिकमध्ये भारताचे बल्ले बल्ले

मल्ल रवीकुमार दहियाला रौप्य
भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे.
कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने भारताच्या रवी कुमारचा पराभव केला. पहिल्या फेरीनंतर रवी कुमार 4-2 असा पिछाडीवर होता. झावूरने प्रत्येकी एक असे दोन गुण मिळवले. त्यानंतर रवीने दोन गुण मिळून बरोबरी केली. तर झावूरने पुन्हा दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर झावूरने आणखी 3 गुण मिळवत आघाडी 7-2 अशी केली. अखेर झावूने रवी कुमारवर 7-4 असा विजय मिळवला.
त्याआधी उपांत्य फेरीत रवीने कझाकिस्तानच्या नूरीस्लाम सनायेवचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत जाणारा रवी हा दुसरा भारतीय होता. याआधी 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने अंतिम फेरीत धडक मारली होती.

Exit mobile version