। चौल । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावची सर्वसाधारण सभा सोमवार, दि. 16 मे रोजी रात्री दहा वाजता कृष्णादेवीच्या मंदिरात पार पडली. यावेळी चौलमळा गावच्या अध्यक्षपदी रवींद्र मधुकर घरत यांची अध्यक्षपदी, तर जितेंद्र दत्तात्रेय पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

चौलमळा गावच्या मावळते अध्यक्ष सुनील घरत यांच्याकडून रवींद्र घरत यांनी गावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. सुनील घरत यांनी आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात गावाच्या हितासाठी अनेक विकासात्मक कामे केली. आपला गाव एकसंघ कसा राहील, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र घरत यांनीसुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही दिली. चौलमळा गावची नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, अध्यक्ष रवींद्र घरत, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव राकेश लोहार, सहसचिव योगेश जाधव, खजिनदार अल्पेश म्हात्रे, सदस्य म्हणून रवींद्र नाईक, दिलीप म्हात्रे, वंदेश लाड, सचिन गोंधळी यांची एकमताने पुढील तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली.







