रविंद्र जाडेजाचे टीममध्ये कमबॅक

। मुंबई । वृत्तसंस्था ।
वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सज्ज आहे. या मालिकेतून अष्टपैलू रविंद्र जाडेजा टीम इंडियात कमबॅक करणे जवळपास पक्के आहे. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघातील तो महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. त्यामुळे तो कशी कामगिरी करणार याची उत्सुकता असेल. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहल आणि रवि बिश्‍नोई अशी फिरकी जोडी पाहायला मिळाली होती. रविंद्र जाडेजाच्या एन्ट्रीमुळे यातील एकाला विश्रांती दिली जाऊ शकते.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी दीपक चहर दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. पण जसप्रित बुमराह विश्रांती घेऊन पुन्हा संघात येत असल्यामुळे ही उणीव भासणार नाही. तो भुवनेश्‍वर कुमार आणि हर्षल पटेल यांच्यासोतब भारतीय जलदगती गोलंदाजीची धूरा सांभाळेल. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा डावाला सुरुवात करताना दिसू शकेल. यावेळी त्याच्यासोबत ऋतूराज येणार की ईशान किशन हे पाहण्याजोगे असेल.

Exit mobile version