रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
रत्नागिरी येथील ज्येष्ठ रंगकर्मी, संकल्प कलामंच चे सर्वेसर्वा रवींद्र साळुंखे यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले. दोन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोना झाला होता. मात्र त्यातून हे बाहेर पडत होते. जिद्दीने या आजारावर मात करत होते. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु आज गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.रत्नागिरीतील परावरच्या नाटकांची परंपरा जपणार्यांपैकी रवींद्र साळुंखे होते. त्यांच्या संकल्प कलामंच या नाट्यसंस्थेच्या माध्यमातील त्यांनी अनेक नाटके सादर केली, विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला.नाटकासाठी सदैव झटणारा एक अत्यंत प्रामाणिक, सच्चा रंगकर्मी अशी त्यांची ओळख होती. रंगमंचासाठी जे आवश्यक ते ते करायची तयारी त्यांची होती. कामगार, राज्य नि औद्योगिक नाट्य स्पर्धांमध्ये या नाटकांतल्या भूमिकांसाठी त्यांना पारितोषिकेही मिळाली होती.