खराब हवामानामुळेच रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले


चौकशी समितीचा निष्कर्ष
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेला अपघात हा खराब हवामानामुळेच झाल्याचा निष्कर्ष अपघाताच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या अहवालातून करण्यात आला आहे.
एअर मार्शल मानवेंद्र सिंग समितीने आपला अहवाल पूर्ण केला असून तो कायदेशीर सल्ल्यासाठी कायदेशीर शाखेकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच हा अहवाल हवाईदल प्रमुखांना सादर केला जाईल.
या अहवालाबाबत हवाई दलाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणाचा शोध घेणार्‍या समितीला असे आढळून आले आहे की, खराब हवामानामुळे वैमानिकांची दिशाभूल झाली असावी, ज्यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला सीफआयटी म्हणजेच ङ्गउेपीीेंश्रश्रशव ऋश्रळसहीं खपीें ढशीीरळपफ म्हणतात. हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version