पनवेलमध्ये मनसेतर्फे रयतोत्सव स्पर्धात्मक कार्यक्रम

। उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना पनवेल रायगड च्या वतीने 20 मे ते 29 मे या कालावधीत दहा दिवसांचा रयतोत्सव 2022 शोध कलेचा शोध कलाकारांचा या स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन चित्रपट सेनेचे पनवेल महानगर अध्यक्ष गणेश सरवणकर यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
नवीन आणि जुन्या कलाकार यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंच उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे परत अशा कलाकरांना मुख्य प्रवाहात आणणे आणि यातून त्यांना पुढे दिशा मिळावी म्हणून चित्रपट सेना रायगड यांनी पुढाकार घेऊन या रयतोत्सव 2022 नावाने स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे.याविषयीची माहिती आज मनसे चित्रपट सेनेच्या वतीने देण्यात आली. यावेळी अक्षय सुतार,कल्पेश कोळी, ,अजय भोईर, गौरी गुजर,वैभव घोडग,चंचला बनकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version