आरबीआयने आठ बँकांना ठोठावला १२ लाखांचा दंड

। मुंबई । वृत्तसंस्था ।
नियमांचेउल्लंघन केल्याने आरबीआयने देशातील विविध राज्यांमधील सहकारी बँकांना १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सहकारी बँकांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील बँकांचा समावेश आहे. डिपॉझिटर एज्युकेशन अ‍ॅण्ड अवेअरनेस फंडमध्ये दावा न केलेल्या ठेवी जमा न करणे, बँक घोटाळ्यांचा उशिरा अहवाल देणे आणि असुरक्षित कर्जे वितरित करणे या कारणांमुळे काही बँकांना दंड ठोठावण्यात आला. नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने मध्य प्रदेशतील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, महाराष्ट्रातील अमरावती सहकारी बँक, मणिपूरमधील वूमन सहकारी बँक, उत्तर प्रदेशातील युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, हरयाणातील भगत को-ऑपरेटिव्ह बँक आणि गुजरातच्या नवनिर्माण को-ऑपरेटिव्हला दंड ठोठावला आहे.

Exit mobile version