आरसीसी संघाचा तिरंगा चषकावर कब्जा

उद्योगपती सागर खारपाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर गावात काँग्रेस आय कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटी चिरनेर, भोम आणि धाकटेभोमच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही रजनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पेठ येथील आरसीसी क्रिकेट संघ तिरंगा चषकाचा मानकरी ठरला असून, या संघाला रोख 1,50,000 रुपये व भव्य चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर चिरनेर येथील श्री महागणपती क्रिकेट संघ उपविजेता ठरला. या संघाला 75 हजार रुपये व भव्य चषक देण्यात आला तसेच गणेशपुरी येथील व्हीआरसीसी क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.

त्यांना 35 हजार रुपये व चषक देण्यात आला.चतुर्थ क्रमांक अक्कादेवी अजय 74 मोठीजुई या क्रिकेट संघाने मिळविला. त्यांनाही 35 हजार रुपये व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले.गणेशपुरी येथील व्हीआरसीसी क्रिकेट संघाचा खेळाडू प्रथमेश कोळी हा मालिकावीर ठरला. त्याला बक्षीस म्हणून बाईक देण्यात आली. तर चिरनेर येथील महागणपती क्रिकेट संघाचा ऋषी नारंगीकर याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून घोषित करण्यात आले. त्याला बक्षीस म्हणून सायकल देण्यात आली. आरसीसी पेठ क्रिकेट संघाचा नमित याला फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले. त्याला बक्षीस म्हणून सायकल देण्यात आली.

अक्कादेवी अजय 74 मोठीजुई क्रिकेट संघाचा जितेश पाटील याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून घोषित करण्यात आले. त्याला बक्षीस म्हणून सायकल देण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पी.पी. खारपाटील कंट्रक्शन कंपनीचे उद्योगपती सागरशेठ खारपाटील, राजिपचे सदस्य बाजीराव परदेशी, शेकापचे चिटणीस सुरेश पाटील, माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, निवेदक राजेंद्र भगत, चेतन पाटील तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते तिरंगा चषकाचे वितरण करण्यात आले.

Exit mobile version