। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आरसीएफ कॉलेज च्या श्रध्दा मल्लिकार्जुन गाढवे हिने उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेत 93.50 एवढे टक्के मिळवले. विशेष म्हणजे श्रद्धाने बायोलोजी या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. श्रद्धाचे वडील आरसीएफ कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरी करत आहेत. विशेष म्हणजे श्रद्धाने चारही विषय घेवून स्वतला सिद्ध केले आहे. पुढे तिने मेडिकल ला जावून डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.