आरसीएफ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

अमोनिया अवेंजर्स संघ विजेता
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी |

आरसीएफ क्रिडासंकुलच्या मैदानात घेण्यात आलेल्या पहिल्या आरसीएफ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद अमोनिया अवेंजर्स संघाने पटकावले. आरसीएफ थळ कारखान्यातील क्रिकेट प्रेमी युवा कर्मचार्‍यांच्या पुढाकाराने आणि व्यक्तिगत योगदानातून यावर्षी प्रथमच आरसीएफ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयपीएलच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अमोनिया अवेंजर्स, एसजीपी स्टिमर्स, युरिया फाल्कन, डब्ल्यूपीएस लायन किंग्ज, आई एलेव्हन आणि साई ग्रुप असे सहा संघ सहभागी झाले होते. या संघांची मालकी अनुक्रमे तेजस गायकर, कल्पेश शेळके, सुनील घरत, संजय वानखेडे, मनोज घरत आणि सतीश पाटील यांच्याकडे होती. आरसीएफ चे कार्यकारी संचालक (थळ) अनिरुद्ध खाडिलकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर लीग पद्धतीच्या सामन्यांना सुरुवात झाली.

साखळी सामन्यात अत्यंत चुरशीची लढत देत अंतिम फेरीत पोहचलेल्या अमोनिया अवेंजर्स संघाने साई ग्रुप संघाचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवून पहिल्या आरसीएफ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. प्रदीप घरतने अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज असे दुहेरी पुरस्कार पटकावले. सर्धेचे उत्कृष्ट फलंदाज केदार बिर्जे, उत्कृष्ट गोलंदाज धीरज पाटील तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अक्षय गोळे यांना घोषित केले गेले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात संतोष राणे, रघुवीर कदम,स्वप्नील वार्डे, अनिकेत पाटील, प्रतीक घाडी, अजिनाथ नागरगुजे, सर्वेश जोशी, अतुल ठाकूर, वैभव दबके, अक्षय गोळे, सुरज घासे, मयूर भोय या युवा खेळाडूंचा सहभाग होता.

Exit mobile version