आरडीसीसी बँक खेळाडूंना प्रोत्साहन देणार- आ. जयंत पाटील

चार खेळाडूंचा आ. पाटील यांच्या हस्ते सन्मान

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याच्या मातीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनेक सर्वोत्कृष्ट खेळाडू देशाला दिले आहेत. कबड्डी खेळाने नावारूपाला आलेला रायगड जिल्हा आता सर्वच जागतिक स्तरावरील खेळांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आता तयार होत आहेत. देशासाठी खेळणाऱ्या या खेळाडूंना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर राहील, असे प्रतिपादन आरडीसीसी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी केले.


रायगड जिल्हा मदबीवर्ती सहकारी बँकेच्या 62 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा अलिबाग येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाली. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर रायगड जिल्ह्यासह देशाचे नाव उज्वल करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा सन्मान रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, ज्येष्ठ सभासद शंकरराव म्हात्रे, बँकेचे सर्व विद्यमान संचालक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँकेतील अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि सभासद, भागधारक उपस्थित होते.


सन्मान करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये तीनविरा अलिबाग येथील जपान येथे झालेल्या महिला ज्युनिअर आशिया करंडक हॉकीमध्ये सुवर्णपदक विजेत्या मनश्री नरेंद्र शेडगे, शेलू-कर्जत येथील अमृता ज्ञानेश्वर भगत हिने रुमानिया येथे संपन्न झालेल्या वर्ल्ड युथ पावरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकाविले, अलिबाग तालुक्यातील शरीरसौष्ठवपटू संजय उले याने नेपाळ येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविला आणि दिव्याक्षी छाया सुनील म्हात्रे या कणे-पेण येथील खेळाडूने फिलिपाईन्स येथे पार पडलेल्या 14 व्या एशियन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले. अशा चार रायगड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मानपत्र, शाल, श्रीफळ आणि 51 हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला.

Exit mobile version