‌‘आरडीसीसी’ लवकरच माथेरानकरांच्या सेवेत

आ. जयंत पाटील यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

| माथेरान | वार्ताहर |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा माथेरान शहरात सुरू होत असून, माथेरानकरांना आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. आमदार जयंत पाटील यांनी माथेरानवासियांना शब्द दिला होता तो पूर्ण केला असून, लवकरच येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा येथे सर्व नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे.

माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून, येथे माथेरान पर्यटनस्थळाला वर्षाकाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. येणाऱ्या पर्यटकांना व येथील स्थानिकांना बँके संदर्भात अनेक समस्या भेडसावत असतात. माथेरान शहरात एकच बँक असून, शहराचे नागरीकरण आणि येथील लोकसंख्या वाढत असून हि एकच शाखा येथील शहरासाठी अपुरी पडत होती. तर अनेकवेळा बँकेचे एटीएमसुद्धा नादुरुस्त असते, यामुळे पर्यटकांची व स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या सर्व बाबींचा विचार करता माथेरान शेतकरी कामगार पक्षाचे शहर अध्यक्ष शफीक बडाणे यांनी आमदार जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा माथेरान शहरात सुरू करावी, असा पत्रव्यवहार केला होता. या विषयाचा गांभीर्याने विचार करून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. जयंत पाटील यांनी माथेरान शहरातील मुख्य बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी बँकेची शाखा सुरू करणार अशी ग्वाही दिली होती. त्या अनुषंगाने मागील काही महिन्यांपूर्वी आ. जयंत पाटील हे माथेरान दौऱ्यावर आले होते. प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आणि तसेच बँकेसाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरू करणार असे सांगितले होते. आता पुढील काही दिवसातच येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा सुरू होत आहे.

माथेरान पर्यटनस्थळी येणारे पर्यटक आणि माथेरान मधील स्थानिक नागरिक यांना अनेक वर्षांपासून बँकेसंदर्भात अनेक समस्या भेडसावत होत्या. यामुळे आम्ही माथेरानवासियांनी आ. जयंत पाटील यांच्याकडे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरू करावी, अशी मागणी केली होती. मंगळवार, दि.10 रोजी मुख्य बाजारपेठेत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरू होत आहे.

शफीक बडाणे, शेकाप, अध्यक्ष, माथेरान
Exit mobile version