। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारातील बिमा व्यापारी संकुलाची निवडणूक नुकतीच पार पडली होती. बिमा कॉम्पलेक्समधील मिटिंग हॉलमध्ये नूतन पदाधिकार्यांच्या निवडीसाठी मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडून आलेल्या संचालक मंडळाने सर्वानुमते रामदास शेवाळे यांची तिसर्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड केली आहे.
गेली 17 वर्ष बिमा व्यापारी संकुलाची सेवा करत असून या वेळी सहकार्यांना संधी मिळावी म्हणून शेवाळे यांनी यावेळी पद न भूषवण्याची भूमिका घेतली होती. परंतु, सोसायटीचे सभासद व संचालक मंडळाच्या आग्रहामुळे त्यांनी हे पद स्विकारत असल्याचे सांगितले. दरम्यान, सोसायटीच्या सचिवपदी वाहतूक व्यावसायिक पुण्यवंत खटकळे तर खजिनदारपदी नारायण फडतरे यांची एकमताने निवड करण्यात आली. किशोरीलाल शर्मा व नारायण आमृले यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले. आबासाहेब लकडे यांच्यावर सहखजिनदार व नवनाथ वनवे यांच्यावर सहसेक्रेटरी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.




