| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
गुरुवारी ठिकठिकाणी जल्लोषात बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी दुसऱ्याच दिवशी सकाळी 213 प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती समुद्र किनारी वाहून आल्या होत्या. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे त्या गणेशमूर्तींचे पुन्हा खोल समुद्रात विसर्जन करण्यात आले. यासाठी सुमारे 60 सदस्यांनी मेहनत घेतली.
मुरुड तालुक्यात प्लास्टरच्या मूर्तीचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु शाडूच्या मूर्तींपेक्षा त्या मूर्त्या स्वस्त मिळतात म्हणून त्या आजही आणल्या जातात. पर्यावरणाला घातक असणाऱ्या मूर्ती खरेदी करू नका याबाबत जनजागृती केली जाते पण त्याचा वापर पूर्णपणे बंद होताना दिसत नाही.
मुंबई गिरगाव चौपाटी येथे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गणेशमूर्ती सोबत आलेले निर्माल्याचे संकलन एक हजार श्रीसदस्यांनी गोळा केले. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन त्यापासून खतनिर्मिती केली. ते पहाण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांनी श्रीसदस्यांना शुभेच्छा दिल्या.