। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड-जंजिरा सार्वजनिक वाचनालय व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरूड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ संपन्न झाला.
यावेळी उपाध्यक्षा दीपाली जोशीबाई यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगून स्वर्गीय माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती सांगून त्याचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिवस साजरा करीत आहोत हे नमूद केले. तसेच, प्रमुख मार्गदर्शक नगरपरिषद शिक्षण समिती प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर यांनी आपल्या मनोगतात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद मुरूड सदस्य नयन कर्णिक, वैशाली कासार, रोटकर, चवरकर, शशीकांत भगत, स्पृहा लखमदे उपस्थित होते. सार्वजनिक वाचनालय संचालिका नैनिता कर्णिक यांनी भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित कविता सादर करून आभार मानले.