आगरी विनोदी कवितांचे वाचन

| चिरनेर । वार्ताहर ।
काव्य दरबाराचे अमृत महोत्सवी संमेलन चिरले येथे कार्याध्यक्षा मिनल शंकर माळी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ घरत यांनी भूषविले होते. यावेळी शेकापचे नवनिर्वाचित सरपंच सुधाकर पाटील, रामचंद्र म्हात्रे,मोहन भोईर, दमयंती भोईर, चंद्रकांत मढवी, जगन्नाथ जांभळे, चंद्रकांत पाटील, म.वा .म्हात्रे, के .एम. मढवी, प्रकाश ठाकूर, अरुण म्हात्रे, मिनल माळी, शंकर माळी, प्रा. दिलीप ठाकूर, दत्तात्रेय म्हात्रे आदी उपस्थित होते.

उपस्थितीत आगरी कवींनी आगरी बोली भाषेतील सादर केलेल्या निसर्ग कविता, प्रेम कविता,लग्न समारंभातील जुन्या रूढी परंपरांची खरी ओळख तसेच लोकगीते आणि पारंपारिक धवले गीते सादर केली.यावेळी के. एम. मढवी, हरिश्‍चंद्र माळी, अनंत पाटील, अरुण म्हात्रे, भगवान ठाकूर, प्रकाश ठाकूर, सदानंद ठाकूर, शिवाजी मोकल, मोहन पाटील, अरुण पाटील, हिरामण पाटील, संजुकुमार ठाकूर, दीपक गावंड यांनी आगरी विनोदी हास्य कवितांचे सादरीकरण केले.तर सरिता पाटील ,मिनल माळी, मनस्वी माळी ,सविता पाटील, स्मिता वाजेकर, मृण्मय माळी, पारस वर्तक यांनी आगरी बोलीतील अर्थपूर्ण कवितांचे वाचन करून, आगरी गोडव्याची चव उपस्थित आगरी लोकांना दिली. कार्यक्रमाचे निवेदन कार्याध्यक्षा मिनल माळी यांनी केले, तर कविसंमेलनाचे सुत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले.

Exit mobile version