रेडिमेड फराळाचा बाजारात दरवळ

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

दिवाळी सण दोन दिवसांवर येवून ठेपला असून आता रत्नागिरीकरांकडून खरेदीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीत हमखास फराळ बनवले जाते. मात्र, आता वाढती महागाई पाहून घरात फराळ बनवण्याऐवजी तयार फराळाला मोठी मागणी वाढली आहे. फराळाचे साहित्य 10 टक्क्यांनी वाढले आहेत.

मिठाई व्यावसायिकांकडून दुकानांबाहेर फराळाचे स्टॉल लावण्यात येत आहे. हिंदू बांधवांचा सर्वात मोठा सण दिवाळी. या निमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात कपडे, मिठाईसह विविध साहित्याची खरेदी करीत असतात. त्यामुळे बाजारपेठात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड पाहावयास मिळत आहे. दिवाळीत हमखास पदार्थ बनतो ते म्हणजे फराळ. पूर्वी मोठ्या प्रमाणात घरोघरी फराळ बनवत होते. मात्र, हळुहळू घरगुती फराळ बनवण्याचे प्रमाण कमी होत आहे. तेल, तूप, रवा, डालडा, मैदा, यासह विविध साहित्याचे दर वाढल्यामुळे घरगुती फराळ कमीच बनवत आहेत.

एकीकडे नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना फराळ बनवण्यास वेळ नसतो. त्यामुळे नोकरदार वर्ग श्रम वाचवण्याऐवजी बाजारातील रेडिमेड फराळाला पसंती देत असून त्यांच्याकडून खरेदी करीत आहेत. मिठाई दुकानदार, बचत गटाकडून रेडिमेड फराळाची विक्री होत आहे. रत्नागिरी शहरातील विविध मिठाई दुकानातून फराळाची विक्री सध्या सुरू आहे. नोकरदार, व्यावसायिक वर्गातून रेडिमेड फराळाला पसंती देत आहेत. तर सर्वसामान्य नागरिक घरोघरी फराळाचे साहित्य बनवण्यास लगबग सुरू केली आहे.

फराळाचे दर प्रतिकिलो
करंजी- 500 ते 600 रूपये किलो- रवा लाडू-550-बेसन लाडू-600- चकली-600- चिवडा-400 रूपये- बेसन लाडू-650- अनारसे-650-शंकरपाळे-300 ते 400-मोतीचूर लाडू-500 ते 600 दर आहे.
Exit mobile version