इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही समाजाची वैचारिक गरज

। पेण । वार्ताहर ।
महात्मा गांधी वाचनालया तर्फे 348 वा राज्याभिषेक सोहळयाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आ. धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, इतिहासाचे यथार्थ ज्ञान असणे ही समाजाची वैचारिक गरज आहे. इतिहासाचे अर्धज्ञान हा शाप आहे. बर्‍याच वेळेला अर्धज्ञानापायी आपण इतिहासात चुकीचे पांईडे पाडतो. तर इतिहासाचा अज्ञान हा अपराध आहे. त्यामुळे इतिहासाची माहिती असणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनपटा विषयी सर्वांना माहिती आहे ते पराक्रमी होते. त्यांच्या तलवारीच्या पराक्रमाचे किस्से सर्वांना माहिती आहेत .परंतु आज या दोन जिजाऊंच्या लेकीने शिवाजी महाराजांच्या वेगळयाच मुद्दावर बोलून वेगळाच प्रकाशझोत टाकला आहे. ज्याप्रमाणे किर्तनकार पूर्ण ज्ञानेश्‍वरी प्रवचन न करता विशिष्ट ओळींवर प्रवचन करत असतात. तसेच पूर्ण शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत न टाकता शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरण तसेच मावळे संघटित करण्याचे धोरण यांवर आज दोन्हीही जिजाउंच्या लेकींनी प्रकाशझोत टाकला आहे.

यावेळी माजी आ. धैर्यशील पाटील यांनी राझ्यांच्या पाटीलांचा किस्सा, कल्याणच्या सुभेदाराची सुन तसेच पुण्या नगरीवर फिरवलेला गाढवाचा नांगर त्या नांगराला प्रतिउत्तर म्हणून जिजाउ आउ साहेबांनी सोन्याचा फाळ असलेला नांगर पुण्यानगरीत फिरवून शेतकर्‍यांना बळ दिले. तसेच दुष्काळाच्या काळात बी-बियाणे, बैल जोडे, अवजारे देउन बळीराजाला प्रोत्साहन दिले. या बाबींवर प्रकाशझोत टाकत आज जे शासनकर्ते शेतीविषयक धोरण आखतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे देण आहे. म्हणूनच इतिहासाचा सार्थज्ञान हा समाजाची वैचारिक गरज असल्याची सांगितले.

यावेळी विकास ठाकुर, हरिश पाटील, आर्या भोईर, शिवा काशीद, सपना खांडेकर, हरेश पाटील, अण्णा वनगे, अत्माराम मोकळ यांनी शिवजंयतीची कहाणी सांगितली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपना नितीन पाटील हिने केले. या कार्यक्रमासाठी अ‍ॅड. मंगेश नेने, जितेंद्र ठाकुर, मंगेश पेडामकर, प्रतिभा जाधव,सुनिता जोशी, भावना बांधणकर, पांडुरंग जाधव, समीर म्हात्रे, नगरसेवक संतोष पाटील, प्रा. एम. एन. पाटील, य. भी. तेरवाडकर, दिपश्री पोटफोडे, सुनीता गावंड, सागर हजारे, चंद्रकांत पाटील अदी उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अप्पा सत्वे, अशोक देसाई व महात्मा गांधी वाचनालयाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Exit mobile version