कृषी सहाय्यक व प्रगतशील शेतकर्‍यांचा सत्कार

। कोर्लई । वार्ताहर ।
कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह समारोप समारंभ निमित्ताने अलिबाग – कुरुळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्ताने अलिबाग, मुरुड व पेण तालुक्यातील शेतकरी, प्रगतशील शेतकरी तसेच कृषी सहाय्यक यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मुरुड तालुका कृषी विभागाचे कृषी सहायक आदिराज चौलकर यांचा सत्कार करण्यात आला.

कृषी विभागाच्या जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी उज्वला बाणखेले, जिल्हा कृषि विकास अधिकारी खुरकुटे, कृषि उपसंचालक, आत्मा सतीश बोर्‍हाडे, उपविभागीय कृषीअधिकारी (अलिबाग), तालुका कृषि अधिकारी अलिबाग, पेण, मुरुड व अलिबाग उपविभागाचे मंडळ कृषि अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक तसेच तिन्ही तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व रिसोर्स बँक मध्ये शेतकरी उपस्थित होते. यावेळी रिसोर्स बँक मधील शेतकरी व प्रगतशील शेतकरी तसेच अलिबाग उपविभागातील उत्कृष्ट काम करणार्‍या कृषि सहाय्यकांचा सत्कार करण्यात आला. मुरूड तालुक्यातील आदिराज अनिल चौलकर कृषी सहाय्यक यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी रिसोर्स बँक मधील शेतकरी व प्रगतशील शेतकरी यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

Exit mobile version