युनेस्कोकडून गडकिल्ले-कातळशिल्पांचा वारसास्थळ म्हणून स्वीकार

नाशिक | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनेचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार झालाय. त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारने युनेस्कोकडे पाठविला होता. नामांकनाचा अंतिम प्रस्ताव तयार करण्याचे काम राज्याच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयातर्फे सुरू आहे. राज्यातील गडकोट, महाराष्ट्राचे सैनिकी स्थापत्य आणि गनिमी कावा युद्धनीती व कोकणातील कातळशिल्पे या संकल्पना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने स्वीकार केला आहे.
राज्य सरकारद्वारे संरक्षित एकही स्मारक युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले नव्हते. आता राज्यातील राजगड, साल्हेर, मुल्हेर, अंकाई, टंकाई, खर्डा, गाळणा आदी किल्ले, तर सिंदखेड राजा येथील स्मारके, भीमाशंकरचे सुंदरनारायण आणि नीरा नरसिंगपूर येथील मंदिरांचे जतन, संवर्धन प्रगतिपथावर आहे. सातारा येथील शस्त्रसंग्रह, नागपूर आणि औंध येथील चित्रसंग्रह आदींच्या ङ्गहाय रेझोल्यूशन फोटोग्राफीङ्घचे काम कोरोनाकाळात पूर्ण झाले आहे. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळातील संग्रहालयाच्या अंतर्गत सजावटीचे काम प्रगतिपथावर आहे.
युनेस्कोकडून निधी युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. शिक्षण, विज्ञान व संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे काम युनेस्कोकडून होते. संस्थेचे मुख्यालय पॅरिसमध्ये असून, जगभर 50 पेक्षा अधिक कार्यालय आहेत. युनेस्कोने मान्यता दिलेल्या जगातील वारसा स्थानाची (वास्तू, ठिकाण, उद्यान, जंगल, सरोवर) यादी जागतिक वारसास्थान समिती तयार करते. ते ठिकाण ङ्गवर्ल्ड हेरिटेजफ म्हणून मान्यता दिल्यानंतर त्या स्थळाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्कोकडून निधी दिला जातो. दरम्यान, गडकोट हे राज्याची संरक्षणस्थळे आहेत. हा जागतिक वारसा म्हणून जतन, संवर्धन होणे आवश्यक होते.

Exit mobile version