मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील अदिती अॅग्रो भात खरेदी केंद्र आंबोलीतर्फे महिनाभरात 7,100 क्विंटलची विक्रमी खरेदी करण्यात आल्याची माहिती संचालक दिनेश मिणमिणे यांनी दिली आहे . या वर्षी शेतकर्यांना भात विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंतच दिली होती पण ही सदर मुदत 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढवून दिली आहे .
मुरुड तालुक्यात यंदा 20 ते21 हजार क्विंटल भाताची खरेदी हमी भाव केंद्रातर्फे शक्य असल्याचे समजते.विशेष बाब म्हणजे बहुतांशी शेतकर्यांनी ऑन लाईन नोंदणी करून भात हमी केंद्राला पसंती दिली आहे . भात खरेदीचे आदेश पणन विभागा कडुन लवकर प्राप्त झाले तरी प्रत्यक्ष भात खरेदी ला एक नोव्हेंबर 2021 पासून सुरु झाली आहे .
शासनातर्फे भात खरेदी सुरु केल्या पासून खासगी व्यापारी वर्गाकडुन होणारी पिळवणुक टळली आहे.शासनाकडून प्रति क्विंटल 1948 / इतका भाव देण्यात येत असुन प्रति क्विंटल 800 रुपये इतका जादा बोनस ही शासनातर्फे थेट बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात येत असल्याने दलालांकडुन सुटका झाल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना शेतकरी वर्गात दिसून येत आहे.. या देऊ केलेल्या हमी भावामुळे एरवी ओस पडलेली भात शेती काही अंशी लागवडी खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे .