। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोनानंतर सगळं काही पुन्हा एकदा सुरळीत होत असताना, लॉकडाऊनचा फटका बसलेल्या मद्य व्यवसायालाही उभारी मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात मद्यविक्रीत मोठी वाढ झाली असल्याने राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. 2020-21 आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ 17 टक्क्यांची आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2021-22 मध्ये गेल्या तीन आर्थिक वर्षातील सर्वाधिक महसूल गोळा केला आहे. महाराष्ट्रात 2019-20 मध्ये 2 हजार 157 लाख लीटर दारुविक्री झाली. पण, कोरोनाचा फटका बसल्यानंतर 2020-21 मध्ये हा आकडा 1 हजार 999 वर आला होता. पण पुन्हा एकदा यामध्ये वाढ झाली असून 2021-22 मध्ये 2358 वर पोहोचला आहे.