जेएनपीटी मध्ये झाली विक्रमी माल हाताळणी

| उरण | वार्ताहर |
गत आर्थिक वर्षात जेएनपीटीने 5.15 दशलक्ष टीईयूची विक्रमी हाताळणी केली आहे. बंदराच्या स्थापने पासून आजवर एका आर्थिक वर्षात केली गेलेली ही सर्वाधिक माल हाताळणी आहे. ही कामगिरी जेएनपीटीचा व्यापार, सागरी तसेच बंदर क्षेत्रातील प्रगतिचा चढ़ता आलेख दर्शवते. बंदराच्या या कामगिरीविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, म्हणाले कोरोना महामारी असतानाही 2021-22 या आर्थिक केल्या गेलेल्या या नेत्रदीपक कामगिरीने बंदराचा व्यवसाय नवीन उंचीवर गेला आहे. आमच्या कामगारांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच आम्ही ही विक्रमी कामगिरी करू शकलो. जानेवारी 2022 मध्ये सुद्धा आमचा माल हाताळणीचा आलेख चढ़ताच राहीला आहे. 2020 च्या 4.47 दशलक्ष टीईयूच्या तुलनेत 2021 मध्ये 5.63दशलक्ष टीईयू (25.86% अधिक) माल हाताळणी करत आम्ही मालवाहतुकीत सातत्यपूर्ण वाढ सुरूच ठेवली आहे.

Exit mobile version