तळा महावितरणकडून कोट्यवधींची वसुली

एक कोटी तीन लाखांपैकी 89 लाख रुपये जमा

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यात महावितरण विभागाने युद्धपातळीवर वीज बिल वसुली मोहीम सुरू केली असून, सध्या नागरिकांकडून थकित वीज बिल वसुलीचा तगादा लावला आहे. ज्या नागरिकांचे वीज बिल बाकी आहे अशा नागरिकांकडून महावितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांमार्फत वीज बिल वसुली करण्यात येत असून, वेळेत वीज बिल न देणार्‍या ग्राहकांचे वीज कनेक्शनदेखील तोडण्यात येत आहे.

आधीच दररोजच भारनियमन व महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना या महिन्यात वीज बिलासोबत अतिरिक्त ठेवी शुल्कदेखील आकारण्यात येणार आहे. तसेच ही सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम भरली नाही तर ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा इशाराही महावितरणकडून देण्यात आला आहे. सध्या तळा तालुक्यात घरगुती 11,984, व्यावसायिक 354, औद्योगिक 77 व कृषी 265 अशी मीटर संख्या आहे. यातील एकूण 14 लाख रुपये थकबाकी ग्राहकांकडून महावितरण विभागाला येणे आहे.

नागरिकांनी आपले वीज बिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे. जे ग्राहक वेळेत वीज बिल भरणार नाहीत, अशा ग्राहकांना नोटीस बजावून त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येईल.

के.डी. महिंद्रीकर, उपकार्यकारी अभियंता, तळा
Exit mobile version