। अलिबाग । वार्ताहर ।
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइज़र्स लिमिटेड मधील नियोजित कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणार्या ऑन लाइन परीक्षेसंबंधी रायगड जिल्ह्याचे रहिवासी असणार्या अनुसूचीत जाती-जमाती, इतर मागासवर्गीय , आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग आणि अनारक्षित गटांतील पात्र उमेदवारांना मार्गदर्शन लाभावे यादृष्टीने भरतीपूर्व जागरूकता कार्यक्रम शुक्रवारी (दि.26)आरसीएफ सभागृह, कुरुळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइज़र्स लिमिटेड या भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमात विविध विभागांमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी भरतीसाठी जाहिरात विविध वृत्तपत्रे तसेच आरसीएफचे संकेतस्थळ www.rcfltd.com या वर प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीला प्रतिसाद देऊन ऑनलाइन अर्ज केलेल्या रायगड जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ऑनलाइन परीक्षेच्या स्वरूपासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्र आरसीएफ लिमिटेड, थळ युनिटतर्फे आयोजित करण्यात येणार आहे. या सत्रात संबंधित विषयांचे तज्ञ उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.