अनवाणी पायांना मिळाल्या चपला

टाकाऊ चप्पलांची पुनर्रनिर्मिती; ग्रीनसॉलचा कौतूकास्द उपक्रम

| पनवेल | वार्ताहर |

आपली पादत्राणे अथवा चपला, बुट खराब झाल्यावर आपण कचऱ्याच्या डब्यात टाकतो. मात्र याच चपलांची पुनर्रनिर्मिती करून गरीब, गरजुंना या चपला वाटप करण्याचे काम ग्रीनसॉल नामक एनजीओ करत आहे. पनवेल महानगरपालिकेने देखील ग्रीनसॉलच्या या उपक्रमाचे कौतूक करत पालिकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या संस्थेसह, या उपक्रमात सहभाग घेतलेल्या खारघरमधील गुडविल पॅराडाइज या संस्थेचे कौतुक केले आहे.

स्वच्छता अभियान, स्वच्छ सर्वेक्षणात पनवेल महानगरपालिका स्वच्छेतेबाबत अशाचप्रकारे टाकाऊ पासुन टिकावू वस्तुची निर्मिती करीत प्रोत्साहन देत असते. पालिकेने देखील विविध चौकात टाकाऊ वस्तुंपासून विविध शोभेचे देखावे, होड्या, तोफा, बस, पुतळे उभारले आहेत. याच धर्तीवर खारघर शहरातील गुडव्हील पॅराडाईज या सेक्टर 15 मधील सोसायटीच्या वेस्ट मॅनेजमेन्ट कमिटीमध्ये सोसायटीचे रहिवासी मोनिका अग्रवाल, एस शंकर, शेफाली त्रिपाठी, रिना दिलीप आदींनी सोसायटीच्या रहिवाशांच्या वापरात नसलेल्या चप्पल, बुट असे 186 जोडे या एनजीओच्या देऊ केल्या आहेत. या जुन्या चप्पलांची पुनर्रनिर्मिती करून त्या ग्रामीण भागात, आदिवासी वाड्यामध्ये गरीब गरजू शाळकरी मुलांना वाटप केल्या जातात.

खेळाडूंना वारंवार लागणारे बूट त्यानंतर काही वेळेला नाईलाजास्तव अनवाणी पायाने चालताना होणारे हाल हि बाब लक्षात घेता. या दोघांनी ग्रीनसॉल एनजीओची स्थापना करून गरीब गरजुंना चप्पल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. याकरिता सोसायटी, शाळा, महाविद्यालय, मोठे कारखानदार तसेच इतर संस्था यांच्याकडून टाकाऊ स्वरूपाच्या चप्पला घेतल्या जातात. याकरिता ग्रीनसॉलची टीम या चप्पल त्याठिकाणी जाऊन चप्पला अथवा बुट जमा करत असते.

राज्यभरात आणि देशात आजवर पाच लाखांपेक्षा जास्त चप्पल वितरित केल्या आहेत. तसेच रायगड, ठाणे, पालघर, भिवंडी परिसरात अनेक ठिकाणी या टाकाऊपासून बनविलेल्या नवीन कोऱ्या चप्पल, बुट या एनजीओने वितरित करीत आहे.

श्रेयन्स भंडारे, ग्रीनसॉलचे संस्थापक

पालिकेकडून कौतूक
स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच नवीनपूर्ण उपक्रम राबवत असते. खारघर मधील गुडव्हील सोसायटीचा पुढाकार आणि ग्रीनसॉल एनजीओचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याची माहिती पालिका उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

Exit mobile version