| मुंबई | प्रतिनिधी |
कोकण किनारपट्टीसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे. गुरुवारी रात्रीपासून कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी बरसताना बघायला मिळत आहेत. आज आणि उद्या असे 2 दिवस मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
हवामान खात्याने राज्यभरातील हवामान पालटण्याचे संकेत दिले आहेत. हवामानात होणाऱ्या बदलानुसार, शुक्रवारी रत्नागिरीला रेड, शनिवारी रायगडसह रत्नागिरीला तर रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी विदर्भासह कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, हवामानातील बदलामुळे विजांच्या कडकडाटासह वादळ, वादळी वारे ताशी 60 किमी वेगाने वाहतील.