रायगड जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

मुसळधार पावसामुळे राज्यासह कोकण आणि रायगड जिल्ह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने रायगड सह रत्नागिरी जिल्ह्यात 7 आणि 8 ऑगस्ट असे सलग दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
यादरम्यान समुद्रात 12 ते 14 फूट उंच लाटा उसळतील. हायटाइडमुळे लोकांना समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पाणी साचले आहे.
पुढील काही दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याप्रमाणे येत्या पाच दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Exit mobile version