किक्रेटमध्येही आता रेड कार्डचा वापर
। ऑकलंड । वृत्तसंस्था ।
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहासातील पहिला टी 20 सामना झाला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना ऑकलंड येथे रंगला होता. या सामन्यात तगड्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 214 धावा चोपल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने देखील 170 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात रिकी पाँटिंगने 55 चेंडूत 98 धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र त्याच्या खेळीपेक्षा अंपायर बिली बाऊडेन यांनी ग्लेन मॅग्राला दाखवलेल्या रेड कार्डचीच चर्चा जास्त झाली.
त्याचं झालं अस की ग्लेन मॅग्राने कायल मिल्सला अंडर आर्म चेंडू टाकला. मात्र हा चेंडू टाकण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग आणि अंपायर यांच्यात एक दीर्घ चर्चा झाली होती. त्यानंतर दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅग्राने हळूवारपणे न्यूझीलंडच्या फलंदाजाकडे अंडर आर्म चेंडू फेकला. नियमाचं उल्लंघन केल्याने अंपायर बिली बाऊडेन यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या मागच्या खिशातून रेड कार्ड काढले आणि मॅग्रा दाखवले. जरी क्रिकेटमध्ये फुटबॉल सारखे रेड, यलो कार्ड दाखवण्याची पद्धत नसली तरी या घटनेची आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहातील पहिले रेड कार्ड म्हणून अशी मजेशीर नोंद झाली.
क्रिकेटमध्ये रेड कार्डची पद्धत नाही. मात्र 2004 – 2005 च्या सुमारास इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेट सामन्यात ही पद्धत प्रायोगित तत्वावर राबवण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही पद्धत क्रिकेट सामन्यात वापण्यात आलेली नाही.