व्यावसायिक सिलिंडर दरात कपात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडर्सच्या किमतीमध्ये सोमवारी (दि.1) मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. ही दरकपात 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडर्ससाठी लागू असेल. सरकारने दरांचा आढावा घेतल्यानंतर सिलिंडरच्या दरांमध्ये तब्बल 171.50 रुपयांची कपात जाहीर केली आहे. यामुळे व्यावसायिक वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी घरगुती सिलिंडर्सच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. दिल्लीमध्ये दरकपातीनंतर सिलिंडर आता 1856.50 रुपयांना उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी मुंबईत हे दर 1808.50 रुपये इतके असतील, तर कोलकातामध्ये 1960.50 रुपयांना व्यावसायिक वापराचे सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. दरकपातीआधी या शहरांमध्ये सिलिंडर्सच्या किमती अनुक्रमे 2028 रुपये, 1980 रुपये आणि 2132 रुपये इतक्या होत्या.

Exit mobile version