• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

हवामानबदलामुळे एकरी उत्पादकतेत घट

Varsha Mehata by Varsha Mehata
January 1, 2024
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
0
SHARES
67
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जगभरात तांदूळ, गहू आणि मका यासारख्या पिकांना हवामानबदलाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना अवर्षण प्रतिरोधक पीक वाण पुरवले जाऊ शकते. सेंद्रीय खते, पीक आवर्तन आणि आंतरपीक पध्दत वापरून जमिनीची सुपीकता सुधारली जाऊ शकते. पावसाचे पाणी साठवणे, ठिबक सिंचन आणि लहान प्रमाणात पाणी साठवण संरचनेचे बांधकाम यासारख्या जलसंधारणाच्या उपायांना चालना दिली जाऊ शकते.

मिलिंद बेंडाळे

भा रतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने हवामानबदलाच्या परिणामांवर संशोधन केले आहे. संशोधनात मॉन्सूनच्या स्वरूपातील बदल आणि त्याचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम तपासण्यात आला. ‌‘नॅशनल इनोव्हेशन इन क्लायमेट रेझिलिएंट ॲग्रीकल्चर’ (निक्रा) प्रकल्पांतर्गत हे विश्लेषण करण्यात आले आहे. हवामानबदलाबाबत योग्य उपाययोजना न केल्यास 2050 पर्यंत पावसावर आधारित भात उत्पादनात दोन ते 20 टक्कयांनी घट होईल, असे या संशोधनातून समोर आले आहे. 2080 पर्यंत परिस्थिती अधिक गंभीर होईल आणि पावसावर आधारित भाताचे उत्पन्न 10 ते 47 टक्कयांनी घटेल. त्याच वेळी हवामानबदलामुळे, 2050 मध्ये गव्हाचे उत्पादन 8.4 ते 19.3 टक्के आणि 2080 पर्यंत 18.9 ते 41 टक्कयांनी कमी होईल. याशिवाय 2050 मध्ये खरीप मक्याच्या उत्पादनात 10-19 टक्के आणि 2080 पर्यंत 20 टक्कयांहून अधिक घट होऊ शकते. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जागतिक तापमानवाढीमुळे देशाच्या विविध भागात हवामानात झपाट्याने बदल होत आहेत. याशिवाय तापमानवाढीमुळे आणि पर्यावरणाविरुद्ध मानवाकडून होत असलेल्या कृतींमुळे काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी उष्णकटिबंधीय चक्रीवादळांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हवामानबदलामुळे तामिळनाडूसह संपूर्ण देशात अतिवृष्टी झाल्याचेही या संशोधनातून समोर आले. मॉन्सूनच्या बदलत्या पॅटर्नचा परिणाम संपूर्ण देशावर झाला आहे. मध्य-उत्तर भारत तसेच पश्चिम हिमालयीन प्रदेशात अतिवृष्टीच्या घटना; उत्तर, उत्तर-पश्चिम भारत आणि लगतच्या मध्य भारतातील मध्यम दुष्काळी क्षेत्राचा विस्तार आणि किनारपट्टीच्या राज्यांमध्ये चक्रीवादळ आणि उष्णतेच्या लाटा दिसून येत आहेत.
‌‘ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स’नुसार हवामानबदलामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश होतो. बदलत्या हवामानामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रांमध्ये कृषी क्षेत्र पहिले आहे.

कारण शेती ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा यांच्या आधारे केली जाते. अशा परिस्थितीत वातावरणातील बदलामुळे पाऊस, उष्णता आणि थंडी नीट सांभाळली गेली नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे हाल होणार आहेत. हिवाळ्यात पाऊस पडल्याने किंवा पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान होते. उन्हाळी हंगामात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो तर काही ठिकाणी दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे अनेक पिके खराब होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. एका संशोधनानुसार सरासरी तापमान एक अंश सेल्सिअसने वाढल्यास गव्हाचे उत्पादन 17 टक्कयांनी कमी होऊ शकते. तसेच तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने भात उत्पादनातही हेक्टरी 0.75 टन घट होण्याची शक्यता असते. नद्यांच्या जवळ असलेल्या उद्योग आणि डाईंग युनिटद्वारे देशातील प्रमुख नद्यांमध्ये टाकला जाणारा रासायनिक कचरा कमी करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. राष्ट्रीय जल गुणवत्ता देखरेख कार्यक्रम, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांच्या मदतीने नद्यांच्या 2,155 निरीक्षण स्थानांवर जलीय स्त्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यात आले असून 4,703 ठिकाणांवर लक्ष ठेवले जात आहे. हवामान बदलाबाबत ठोस पावले न उचलल्यास येणाऱ्या काळात पिकांवर याचा मोठा परिणाम होणार असून लोकांना त्रासाला सामोरे जावे लागेल.

अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा आणि इतर हवामान-प्रेरित घटनांमुळे भारताच्याच अन्नसुरक्षेचेच नव्हे तर शेतीवर अवलंबून असलेल्या देशातील 45 टक्के लोकसंख्येचे जीवनमान धोक्यात येऊ घातले आहे. पंजाबमध्ये 35 लाख हेक्टर परिसरामध्ये पेरलेल्या गव्हाच्या किमान 40 टक्के भागावर पाऊस, वारा आणि गारपिटीचा परिणाम झाला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मते, अंदाजे 85 टक्के बजेट पगार आणि इतर प्रशासकीय/आस्थापनांवर खर्च केले जाते. संशोधनासाठी फारच कमी शिल्लक राहते. हीच बाब राज्यातील कृषी विद्यापीठांनाही लागू होते. भारतात कृषी जीडीपीच्या टक्केवारीनुसार एकूण संशोधन आणि विकासावरील खर्च गेल्या दोन दशकांमध्ये 0.3-0.5 टक्कयांवर स्थिर राहिला आहे. ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेने केलेल्या विश्लेषणामध्ये आढळून आले आहे की 2005 पासून हवामानातील घटनांची वारंवारता आणि तीव्रता सुमारे दोनशे टक्कयांनी वाढली असून देशातील चारपैकी तीन जिल्ह्यांना हवामानबदलाचा सामना करावा लागत आहे. जागतिक हवामान संघटनेच्या अभ्यासानुसार, हवामान-प्रेरित बदलांमुळे भारताला वार्षिक सरासरी सहा लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. विविध प्रदेश, उत्पादकता क्षेत्रे आणि पिकांवर दीर्घकालीन हवामानबदलाचे परिणाम एकसारखे नसतात. अतितापमान आणि पर्जन्यमानातील अल्पकालीन बदलांचा प्रभाव लक्षणीय आहे आणि दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत त्यांचा उत्पन्नावर नकारात्मक प्रभाव पडतो. कमी, सरासरी आणि उच्च उत्पादकता क्षेत्रांमध्ये हवामानबदलाच्या परिणामांमध्ये वितरणात्मक विषमता दर्शवतो. या पार्श्वभूमीवर अल्प आणि दीर्घकालीन पीक प्रतिसादांचे स्वतंत्र मॉडेल तयार करण्यासाठी तापमान, पाऊस, वाढत्या हंगामाची लांबी आणि पीक उत्पादनावरील गेल्या 50 वर्षांच्या डेटाचा वापर करण्यात आला. वाढते तापमान आणि कमी होणारा पाऊस यामुळे पीक उत्पादन कमी होते; परंतु उत्पादनाचा प्रसारदेखील वाढतो. तेव्हा संशोधनात आढळले की शेतकरी धान आणि मक्याच्या उत्पादनासाठी तापमानातील बदलांशी जुळवून घेण्यास सक्षम होते; परंतु गव्हासाठी नाही. धानाच्या बाबतीत, तापमानात एक अंश सेल्सिअस वाढ झाल्यामुळे अल्पावधीत पीक उत्पादनात सहा टक्के आणि दीर्घकाळात चार टक्के घट झाली. मक्याच्या बाबतीत अल्प आणि दीर्घ मुदतीत अनुक्रमे नऊ आणि एक टक्का घट झाली. शेतकरी वेगवेगळ्या प्रदेशात आणि पिकांसाठी स्वतःला जुळवून घेत आहेत.

उदाहरणार्थ, उष्ण उन्हाळ्यातील जिल्हे नैसर्गिकरित्या थंड प्रदेशातील जिल्ह्यांपेक्षा जास्त तापमानात चांगले परिणाम देतात. तापमानात एक अंश सेल्सिअसच्या वाढीमुळे भात आणि गहू उत्पादकता पहिल्या परिणामात अनुक्रमे 23 टक्के आणि नऊ टक्के घट होते; परंतु नवव्या परिमाणात ही घट केवळ सहा आणि पाच टक्के आहे. विशेष म्हणजे कमी क्षेत्रात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या भागात काम करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा वेगळा प्रतिसाद होता. कमी उत्पादक भागातील शेतकरी अधिक अनुकूलन उपायांचा अवलंब करतात. जास्त उत्पादकता असलेल्या भागात आधीच जास्त सिंचन सुविधा आहेत आणि ते मॉन्सूनवर कमी अवलंबून आहेत. परिणामी, दीर्घकालीन आणि अल्पकालीन प्रभावांमधील फरक जवळजवळ नगण्य आहे.  पावसाच्या शंभर मिलीमीटर वाढीमुळे भात उत्पादन सरासरी 2.4 टक्के वाढते. उत्पादकता कमी असलेल्या भागात तांदळाची उत्पादकता 3.5 टक्कयांनी वाढते. त्या तुलनेत जादा उत्पादकता असलेल्या भागात ती फक्त एक टक्का वाढते. उच्च-उत्पादक क्षेत्रांमध्ये सिंचनाची चांगली सोय असल्याने कमी उत्पादक क्षेत्रांना जास्त-उत्पादक क्षेत्रांपेक्षा वाढलेल्या पावसाचा अधिक फायदा होतो. तापमानात एक अंश सेल्सिअस वाढ झाल्यामुळे गव्हाच्या उत्पादकतेवर अल्प आणि दीर्घ कालावधीत तीन टक्के परिणाम होतो. पावसात शंभर मिलीमीटर वाढ झाल्यास गव्हाच्या उत्पादकतेवर 2.5 टक्क्यांनी नकारात्मक परिणाम होतो.

बदलत्या हवामान स्थितीशी जुळवून घेणे सर्व पिकांमध्ये एकसमान नसते. याचा अर्थ शेती-विशिष्ट गरजांनुसार तयार केलेली शेती व्यवस्थापन धोरणे बदलत्या हवामान परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील. शेतकऱ्यांना अवर्षण प्रतिरोधक पीक वाण पुरवले जाऊ शकते. ते जास्त काळ दुष्काळ सहन करू शकतात. अशा पिकांना कमी पाणी लागेल. त्याच वेळी जमिनीची सुपीकता सुधारण्यावर भर द्यायला हवा. सेंद्रीय खते, पीक आवर्तन आणि आंतरपीक पध्दत वापरून जमिनीची सुपीकता सुधारली जाऊ शकते. पावसाचे पाणी साठवणे, ठिबक सिंचन आणि लहान प्रमाणात पाणी साठवण संरचनेचे बांधकाम यासारख्या जलसंधारणाच्या उपायांना चालना दिली जाऊ शकते. पूर-प्रतिरोधक बियाणे साठवण सुविधा आणि सिंचन प्रणाली विकसित केल्या जाऊ शकतात. शेतकऱ्यांना विविध प्रकारची पिके घेण्यास प्रोत्साहित केल्याने एकाच पिकावरील त्यांचे अवलंबित्व कमी करून हवामानबदलाची असुरक्षितता कमी करण्यात मदत होऊ शकते.
(लेखक वन्यजीव आणि पर्यटनविषयक अभ्यासक आहेत.)

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

जागावाटपाचा घोळ

Next Post

अलिबाग पेट्रोल पंपावर वाहनधारकांची तोबा गर्दी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
जिल्ह्याला ट्रक चालकांच्या आंदोलनाचा फटका

अलिबाग पेट्रोल पंपावर वाहनधारकांची तोबा गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?