| पनवेल | वार्ताहर |
उमरोली येथील घरातील फ्रिजला लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रकाश मढवी यांच्या उमरोली येथील घरातील फ्रिजला 30 जून रोजी आग लागली. फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. आग लागली त्यावेळेस घर बंद होते. या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. गावातील नागरिकांनी ही आग विझवली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नेरे परिसरात महावितरण चे तीन तेरा वाजले आहेत. दिवसा तसेच रात्री वीज गायब होत आहे. वीज ये जा करत असल्याने अनेक उपकरणे नादुरुस्त होत आहेत. विजेच्या चढउतारामुळे ही आग लागली असल्याचे बोलले जात आहे. आगीत मोठ्या प्रमाणात वस्तूंचे नुकसान झाल्याने समाजातील दान शुरांकडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.






