‌‘ई-पीक ॲप’मध्ये पीकपेरा नोंदणी करा

तहसीलदाराचे शेतकऱ्यांना आवाहन

| वावोशी | वार्ताहर |

शेतकऱ्यांनी आपल्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये पीकपेरा नोंदणी करा, असे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. सध्या मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी पीकपेरा टाकण्याचा कार्यक्रम चालू झाला असून, प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोबाईलद्वारे आपल्या शेतातला पिकांचा पेरा टाकून घ्यावा. पीकपेरा हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

पीकपेरा टाकल्यामुळे आपणास पीक कर्ज, पीक विमा, दुष्काळी अनुदान, खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी फायद्याचे होणार आहे. त्यामुळे आपण आपला पिक पेरा लवकरात लवकर टाकून घ्यावा, पीकपेरा नोंदणी करतेवेळेस काही अडचण आल्यास आपल्या मोबाईलमधील आपण डाऊनलोड केलेले पहिले ॲप डिलीट करून परत नव्याने ॲप डाऊनलोड करून घ्यावे व आपला पेरा टाकावा, अशी विनंती तहसीलदार तांबोळी यांनी शेतकऱ्यांना केली आहे.

Exit mobile version