| पनवेल | वार्ताहर |
पनवेल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या वर्षभरात 53 हजार 276 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. यात 29 हजार 678 दुचाकी तर 14 हजार 341 चारचाकी वाहनांची समावेश आहे. तसेच इलेक्ट्रीक जवळपास 3 हजार इलेक्ट्रीक वाहनांची नोंद झाली असल्याने वर्षभरामध्ये तब्बल 442 कोटी 40 लाखांचा महसूल जमा झाला आहे.
उप-प्रादेशिक परिवहन विभागाने कर वसुलीबरोबरच रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन व्हावे यासाठी पनवेल परिवहन विभागाने विविध कारवाया केल्या आहेत. त्यातून विभागाच्या उत्पन्नात भर पडली. तसेच वाहन व परवाना नोंदणी, नूतनीकरण, विविध प्रकारच्या परवान्यांचे शुल्क, तसेच व्यवसाय कर, पर्यावरण कर, आकर्षक क्रमांकातून मिळणारे उत्पन्न, वायुवेग पथकाच्या कारवाया, क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक करणार्या वाहनांना दंड, अवैध प्रवासी वाहनांच्या दंडातून शुल्क स्वरूपात मिळालेल्या रकमेबरोबर वर्षभरात विविध कारवाया केल्या आहेत. तसेच विकास होत असल्याने वाहनांची संख्या वाढली आहे.
दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये आवडता नंबर घेण्याचा ओढा तरुणांमध्ये आहे. तसेच वायुवेग पथकाने केलेल्या कारवायांतून मिळालेला दंडाच्या रकमेचा वाटाही अधिक आहे. त्यामुळे साहजिकच महसूल वाढला आहे.
गजानन ठोंबरे,
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल