पदवीधर मतदारांच्या नोंदणीला सुरुवात

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यात पदवीधर मतदार संघातील मतदात्यांना मतदान करता यावे यासाठी मुरुड तहसील कार्यालयात अर्ज वाटप प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आगामी काळात कोकण पदवीधर मतदार संघासाठी मतदान संपन्न होणार आहे. 30 ऑक्टोबर पर्यंत हे अर्ज जमा करावयाचे आहेत. यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर या निवडणुकीत मतदान करणार आहे. अर्ज जमा करतेवेळी पदवीधर गुण पत्रिका, निवडणूक ओळखपत्र, शिधा पत्रिका व आधार ओळखपत्र यांच्या छायांकीत प्रती अर्जाला जोडण्याचे आवाहन मुरुड तहसील कार्यलयामार्फत करण्यात आले आहे.

सन 2020 पर्यंत पदवीधर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या शाळातील पदवीधारक मतदानास पात्र धरण्यात आले आहेत. प्राथमिक शाळेतील, माध्यमिक व उच माध्यमिक व महाविद्यालयातील सर्व पदवी प्राप्त शिक्षकांनी अर्ज भरून मतदाते होण्यासाठी सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन महसूल खात्यामार्फत करण्यात आले आहे.

गट शिक्षण अधिकारी यांनी प्रत्येक शाळेला सूचना पत्र पाठवून पदवी धारक शिक्षकांना फॉर्म भरून घेण्याचे आवाहन करावे व जास्तीत जास्त मतदाते निर्माण करावेत अशी जनतेकडून मागणी होत आहे. कारण हे मतदान सर्वसामान्य नागरिकांसाठी नसल्याने फक्त पदवीधर मतदान करणार आहेत. मुरुड तालुक्यात सर्वाधिक पदवीधारक असून मुरुड तहसील कार्यलयातून अर्ज प्राप्त करून विहित नमुन्यात योग्य ती कागदपत्रे जोडून लवकरात लवकर जमा करून निवडणूक प्रक्रियेला सहकार्य करा, असे निवडणूक आयोगाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version