उद्या अलिबागमध्ये आयएसपीएलचे रजिस्ट्रेशन

चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आयएसपीएल लीग टेनिस क्रिकेट स्पर्धा मुंबई येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम रविवारी (दि.18) सकाळी दहा वाजता वेश्‍वी येथील मॅपल आयव्ही हॉटेलच्या सभागृहात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपिठ मिळावे यासाठी शेकापच्या माध्यमातून पीएनपी चषक एक भव्य स्पर्धा आयोजित केली होती. यातून खेळाडूंना खेळण्याची व प्रेक्षकांना या स्पर्धा पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हणून लोकप्रिय असणारी तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि अनेक सुपरस्टार ज्या क्रिकेट स्पर्धेसोबत जोडले गेले आहेत अशा टेनिस क्रिकेट स्पर्धेत स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी यासाठी राज्यातील पहिला प्रयत्न चित्रलेखा पाटील यांच्यावतीने करण्यात येत आहे. अलिबाग-मुरुड-रोहा तालुक्यातील सर्व क्रिकेटर्ससाठी ‘आयएयपीएल लीग 2024’ टेनिस क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख, मा. नगरसेविका, युव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी मिळणार आहे.

या निमित्ताने स्पर्धेच्या रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गावोगावी असणार्‍या क्रिकेटर्स यांना एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा अगळा वेगळा कार्यक्रम अलिबागमघ्ये पहिल्यांदाच होत आहे. यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नगरसेवक तथा माजी गटनेते प्रदिप नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख तथा मा. उपनगराध्यक्ष अ‍ॅड. मानसी म्हात्रे, मा. नगरसेवक अ‍ॅड. गौतम पाटील आदी मान्यवर तसेच सिलेक्शन कमिटीचे अमरजीत गाध्री व इतर कमिटीचे सदस्य, आयएसपीएल मधील माझी मुंबईचा कर्णधार योगेश पेनकर व इतर खेळाडू यावेळी उपस्थित राहणार आहेत.
आपल्या स्थानिक खेळाडूंनी या स्पर्धेचा एक भाग होऊन आपल्या तालुक्याचे नाव उज्वल करावे हा या मागचा उद्देश असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

स्पर्धकांसाठी सुचना
सहभागी स्पर्धकांनी येताना आधारकार्ड, पॅनकार्ड आणि दोन फोटो घेऊन यावेत. प्रथम येणार्‍या 100 खेळाडूंचे रजिस्ट्रेशन नोंदणी विनामूल्य असणार आहे. तर, 100च्या पुढील सर्व खेळाडूंना 1 हजार 179 रुपये एवढे नोंदणी शुल्क असणार आहे. हे नोंदणी शुल्क फक्त गूगल पे, फोन पे, पेटीएम द्वारेच भरता येणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आलेले आहे.
Exit mobile version