कडावमध्ये आदिवासी ईश्रमची नोंदणी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आदिवासी उत्थान सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत कडाव तालुका कर्जत येथे आदिवासी ई.श्रम नोंदणी शिबिर घेण्यात आले. सदर शिबिर हे समता केंद्र सामाजिक शैक्षणिक संस्था कर्जत आणि कष्टकरी मुक्ती संघटना कामगार आयुक्त कार्यालय पनवेल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास तहसीलदार विक्रम देशमुख यांनी उपस्थित राहून मनमोकळेपणें आदिवासी बंधू भगिनिन सोबत चर्चा केली. कष्टकरी मुक्ती संघटना मधु पाटील, स्मिता काळे, कादंबरी काळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास आदिवासी शेत मजुरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काडव टाकवे तल्याचीवाडी या आदिवासी वाडीतील नागरिक हजर होते. तसेच तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ आधिकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास आशोक किसन पवार, भीमाबाई किसन पवार,किसन पांडू पवार यांनी विशेष सहभाग दर्शवला. सदर कार्यक्रमास प्रांत अधिकारी आजित नेराळे यांनी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version