नोंदणी, मुद्रांक कार्यालये सुट्टीच्या दिवशी राहणार सुरु

| रायगड | खास प्रतिनिधी |

नोंदणी व मुद्रांक विभागाचे रायगड जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालये 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च 2024 या सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

1 एप्रिल 2024 पासून नवीन (सुधारित) बाजारमूल्य दर तक्ते लागू होत असतात. त्यामुळे दस्त नोंदणीची वाढती संख्या विचारात घेता होणारी गर्दी टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यालये सुरु ठेवण्यात येणार आहेत, असे मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीकांत सोनवणे यांनी सांगितले.

Exit mobile version