आंबेवाडी आरोग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कार

| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यदायी वातावरण त्याचप्रमाणे स्वच्छ व निर्मल वातावरण निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडीला जाहीर झाला आहे. 2 ऑक्टोंबर 2014 ला महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत मिशनला देशात सुरुवात झाली. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संदर्भात स्वच्छ व आरोग्यमय वातावरणात चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या उदात्त उद्देशाने कायाकल्प पुरस्कार देण्यात येतो. शासनाकडून सार्वजनिक आरोग्य सुविधांचे स्वच्छता व संसर्ग नियंत्रण पद्धतीना प्रोत्साहन देण्यासाठी कायाकल्प पुरस्कार उत्कृष्ट उपाय योजनांवर आधारित आरोग्य केंद्रांना पुरस्कृत करण्यात येतो.

प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी संस्थेमध्ये कायाकल्प योजनेचे सर्व निकष त्याचप्रमाणे आरोग्य सेवेतील गुणवत्ता, सोयी, सुविधा, उत्कृष्ट आरोग्य सेवा त्याचप्रमाणे बायोमेडिकल उत्कृष्ट व्यवस्थापन या सर्व बाबी सातत्याने प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी ने राबविल्याचे आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश वाघ यांनी सांगितले. योजना वेळोवेळी राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय ससाणे यांचे मार्गदर्शन असते. प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी ला जाहीर झालेला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व डॉक्टर्स, पारिचारिका, आरोग्य सेवक, सेविका, अधिकारी वर्ग यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

Exit mobile version