पुराच्‍या पाण्‍यात अडकलेल्‍या गुराख्‍याची सुटका

20 बकऱ्यानाही वाचवले
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पुराच्‍या पाण्‍यात अडकलेल्‍या एकाला कोलाड येथील महेश सानप यांच्‍या बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले. नागोठणे जवळील चिकणी येथील एकजण बकरया चारायला गेला होता. पावसाचा जोर वाढताच आंबा नदीच्‍या पाण्‍याची पातळी वाढून पाणी शेतात शिरले आणि तो पाण्‍यात अडकला. प्रशासनाला याची माहिती मिळताच तहसीलदार गीता जाधव आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीसांनी तत्‍काळ बचाव पथकाला पाचारण केले व पथकाने गुराख्‍यास‍ह त्‍याच्‍या 20 बकरयांनाही सुखरूप बाहेर काढले.

Exit mobile version